पडतो असा कोसळून
की तुझ्यासाठी उदया नाही
पडल्याजागी थांबत मात्र
एक क्षणभर ही तू नाही
कुणासाठी प्रेम
कुणासाठी आशा
कुणा साठी अगदी
खोळंबा ही
स्वप्ने कुणाची पूर्ण करतो
कुणाची नेतोस वाहून
कित्येकांना स्वप्नं पाहायला ही
तूच द्यावं शिकवून
सर्वांचा असूनही
कसा रे तू
कुणाचा च कधी नाही
तुझ्या एक एका
सरिवर ही
कोण वाहत राही
रे, वेड्या (पावसा/ प्रेमा)
थांब जरा
माझ्या या मनी
बघू दे मला
काय आहे किमया
कोसळण्याची
विना कारणी
コメント